Pimpri-Chinchwad: माझ्या पत्नीकडे माझ्या अंतिम संस्कारासाठी पैसे नाहीत. माझा अंतिम संस्कार शवदाहिनीत करा. गणेश आणि श्रावणी दोघे मिळून रहा. गणेश आपल्या छोटीला सांभाळ. मम्मीला त्रास देऊ नका आणि घरात जे बनवतील तेच खा…अशा आशयाची सुसाईड नोट लिहून राजू नारायण राजभर या तरुणाने सावकाराला कंटाळून आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे पिंपरी- चिंचवड मध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटने प्रकरणी निगडी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. राजू कुमार आणि रजनी सिंग अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोघेजण फरार आहेत. त्यांचा शोध निगडी पोलीस घेत आहेत. आत्महत्यापूर्वी राजू नारायण राजभर यांनी व्हिडिओ देखील रेकॉर्ड केला आहे.