बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी झाली. या हत्येला जवळपास 26 दिवसांचा कालावधी झाला आहे. या घटनेच्या निषेधार्थ राज्यातील ठिकठिकाणी मोर्चे काढून निषेध नोंदविला जात आहे. आज पुण्यातील लाल महाल ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात संतोष देशमुख यांच्या कुटुंबांतील सदस्य सहभागी झाले होते. यावेळी संतोष देशमुख यांच्या भावाने आणि लेकीने त्यांच्या भावना व्यक्त केला. तसेच “आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे”, अशी मागणी देखील देशमुख कुटुंबानं यावेळी केली. ( क्रेडिट- सागर कासार )