Suresh Dhas: संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण गेल्या महिन्यापासून चर्चेत आहे. कारण मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणातला मास्टरमाईंड असल्याचा संशय असलेला आरोपी वाल्मिक कराड हा देखील पोलिसांना शरण आला आहे. दरम्यान भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा होत नाही तोपर्यंत आपण शांत बसणार नाही असं म्हटलं आहे. अशातच आज पुण्यात झालेल्या मोर्चामध्ये “वाल्मिक आण्णा उर्फ ‘आका’ 17 मोबाईल नंबर वापरतात”, असं वक्तव्य सुरेश धस यांनी केलं आहे.