संतोष देशमुख हत्या प्रकरण विरोधकांनी लावून धरलं आहे. या प्रकरणी आज सर्वपक्षीय नेते थेट राज्यापालांची भेट घेण्यासाठी गेले होते.
संतोष देशमुख यांची जी क्रूरपणाने हत्या केली गेली ती खऱ्या अर्थाने माणुसकीची हत्या केलेली आहे. हा विषय जातीच्या पलिकडचा असल्यामुळे आम्ही सर्वपक्षीय नेत्यांनी राज्यपालांनी विनंती केली. सामान्य माणसांचा जो काही आक्रोश चालू आहे ते महाराष्ट्राला परवडणारं नाही, हे सांगण्यासाठी आलो असं माजी खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले.