Sujay Vikhe Patil Statement on Shirdi Saibhakta : “शिर्डीतील साई संस्थानच्या प्रसादालयात भक्तांना देण्यात येणारे मोफत जेवण बंद करा आणि जेवणासाठी पैसे आकारावे”, अशी मागणी माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी शिर्डीतील एका कार्यक्रमात केली होती. त्यांच्या या वक्तव्यावर राजकीय पटलावरून अनेकविध प्रतिक्रिया आल्या. विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली. पण, सुजय विखे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचंही त्यांनी पुन्हा स्पष्ट केलं आहे. दरम्यान शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी सुजय विखे पाटील यांना दोनच प्रश्न करून ऐकवलं आहे.