First Case of HMPV Virus in India : HMPV या व्हायरसचा भारतात पहिला रुग्ण आढळला आहे. एका आठ महिन्यांच्या बाळाला HMPV या व्हायरसची लागण झाली आहे. ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस असं या व्हायरसचं नाव आहे. आठ महिन्यांच्या बाळाला या व्हायरसचा संसर्ग झाला आहे. बंगळुरुतल्या रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान यावरून आता महाराष्ट्रात सुद्धा अलर्ट जारी करण्यात आला आहे. या परिस्थितीत आपण नक्की चिंता करायला हवी का? कोणती काळजी घ्यायला हवी याविषयी डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिलेली माहिती पाहा.