Torres Jewellery Shop Scam: दहा टक्के व्याजाचे आमिष दाखवत टोरेस नावाची आर्टिफिशल डायमंड विक्री करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याची बातमी वाऱ्या सारखी सर्वत्र पसरली. नागरिकांना उच्च परतावा देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपये गोळा करत गुंतवणूकदारांची फसवणूक करून पसार झाल्याची माहिती आहे. मीरा भाईंदर ,दादर पाठोपाठ कल्याण मधील टोरेसचे दुकान आज बंद असल्याचे निदर्शनास आल्याने गुंतवणूकदार संतप्त झाले आहेत. आज कल्याण मधील टोरेसच्या दुकानासमोर शेकडो गुंतवणूकदार जमले. फसवणूक करणाऱ्या कंपनी मालकाने दुकान बंद केले आहे त्यांचे फोन लागत नाही आमची फसवणूक झाली आहे. या मालकावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे. तर दादर सह मुंबईच्या कार्यालयावर गुंतवणूकदारांची आक्रमक भूमिका पाहत कल्याण खडकपाडा पोलिसांनी दुकाना बाहेर मोठा बंदोबस्त लावला आहे.