HMPV India Cases: कर्नाटक, तमिळनाडूआणि गुजरातमध्ये ‘ह्युमन मेटान्युमोव्हायरस’ (एचएमपीव्ही) विषाणूची लागण झालेले पाच रुग्ण आढळले असले, तरी हा विषाणू भारतासह जगभरात आधीपासूनच अस्तित्वात असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी स्पष्ट केले. भारतीय वैद्याकीय संशोधन परिषदेला (आयसीएमआर) एकात्मिक रोग निरीक्षण मोहिमेंतर्गत (आयडीएसपी) उपलब्ध माहितीनुसार सर्दी, शीतज्वरसारखा आजार किंवा गंभीर तीव्र श्वसनविकारांमध्ये वाढ आढळली नसल्याचे सांगतानाच परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले.