Mumbai Fraud Torres Investment: वाढीव व्याजदर, लक्जरी पाहुणचार, गुंतवणूकदारांशी गोड गोड बोलून अगदी सामान्य भाजीवाल्यापासून ते व्यवसायिकांपर्यंत अनेकांना गुंतवणूक करण्यासाठी आधी आकर्षित केलं गेलं आणि हजारो कोटींची गुंतवणूक झाल्यावर एका एकी सर्व शाखांना कुलूप लावून मालक फरार झाले.. एखाद्या स्कॅम बेस मूव्हीचं कथानक वाटावं अशी ही व्यथा खरोखरच घडलीये आणि ती सुद्धा देशाचं आर्थिक राजधानीत म्हणजेच मुंबईत. मुंबईतील ‘टोरेस’ या दागिने विक्रीसह गुंतवणुकीचा व्यवसाय करणाऱ्या विदेशी कंपनीकडून गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. आतापर्यंत आपण सुद्धा सोशल मीडियावर टोरेस दुकानांच्या बाहेर गर्दी झाल्याचे व्हिडीओ पाहिलेच असतील पण हे नेमकं प्रकरण काय आहे हे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.