नागपुरातील खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या दोन रुग्णांना ‘एचएमपीव्ही’ असल्याचे खासगी प्रयोगशाळेतील तपासणीत पुढे येत आहे. परंतु नागपूर महापालिकेचा आरोग्य विभाग आयसीएमआरच्या प्रयोगशाळेत या रुग्णांची पुन्हा तपासणी करूनच या रुग्णाच्या नेमक्या आजाराची माहिती कळू शकणार असल्याचं सांगतिलं जात आहे. याविषयी जिल्हाधिकारी विपीन इटनकार यांनी माहिती दिली आहे.