बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी करत सोमवारी सर्वपक्षीय नेत्यांच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली. दुसरीकडे सुमारे तासभर झालेल्या चर्चेनंतर उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी चौकशीत अद्याप कोणाचेच नाव पुढे नसल्याचे सांगत मुंडे यांना एकप्रकारे अभय दिलं आहे.