ह्युमन मेटान्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) या साथरोगाचा धोका लक्षात घेऊन पुणे महापालिकेकडून तयारी करण्यात आली आहे.नायडू संसर्गजन्य रुग्णालयात विलगीकरणासाठी ५० रुग्णशय्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. भविष्यात एचएमपीव्हीची साथ वाढल्यास त्यासाठी नायडू रुग्णालयांत विलगीकरणासाठी ३५० रुग्णशय्यांची व्यवस्था आहे. याचबरोबर खासगी रुग्णालयांची मदत घेऊन विलगीकरणासाठी ३ हजार ५०० रुग्णशय्यांची व्यवस्था करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्यप्रमुख डॉ. नीना बोराडे यांनी दिली आहे.