HMPV cases in Nagpur: नागपुरातील खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या दोन रुग्णांना ‘एचएमपीव्ही’ असल्याचे खासगी प्रयोगशाळेतील तपासणीत पुढे आले आहे. पण नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागाने आयसीएमआरच्या प्रयोगशाळेत या रुग्णांची पुन्हा तपासणी करूनच या रुग्णाच्या नेमक्या आजाराची माहिती कळू शकणार असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, दरम्यान अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) नागपूरचे संचालक प्रशांत जोशी यांनी याबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे.