मुंडे समर्थकांच्या आपल्याला धमक्या येत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला होता. त्यावर आता भाजपाच्या आमदार तथा मंत्री पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषदेत भाष्य केलं आहे. माझेच कार्यकर्ते असतील हे कशावरून? जर माझे कार्यकर्ते असतील तर त्यांनाही शिक्षा व्हायला हवी तसंच आपला याच्याशी काहीही संबंध नाही, असंही पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं.