Nagpur Tiger Case: उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यात ३१ डिसेंबरला पर्यटक वाहनांनी वाघीण आणि तिच्या बछड्यांचा दोन्ही बाजूने मार्ग रोखल्याची घटना उघडकीस आली होती. पर्यटनाच्या नावावर अशाप्रकारच्या घटना वारंवार होत असल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याप्रकरणाची गंभीर दखल घेतली. उच्च न्यायालयाने याबाबत सोमवारी स्वत:हून जनहित याचिका दाखल करण्याचे आदेश देत राज्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षकांना दोन दिवसात जबाब नोंदविण्याचे आदेश दिले.