MNS Party Internal Changes for BMC Elections: नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकात महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसेला एकही जागा जिंकता आली नाही. त्यामुळे पक्षाच्या कार्यपद्धती व पुढील वाटचालीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले होते. तसेच, मनसे-ठाकरे गट एकत्र येण्याच्याही चर्चांना उधाण आलं होतं. या पार्श्वभूमीवर मनसेबाबत मोठी अपडेट समोर आली असून पक्षात मोठे फेरबदल होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रसारमाध्यमांना यासंदर्भातली माहिती दिली आहे.