अंजली दमानिया यांनी बीड सरपंच हत्या प्रकरणावर अनेकदा सोशल मिडिया पोस्ट करून किंवा प्रत्यक्ष माध्यमांशी संवाद साधताना भाष्य केलं आहे. यासंदर्भात त्यांनी अनेक दावे करणाऱ्या पोस्टही केल्या आहेत. या पोस्टमध्ये दाव्यांच्या समर्थनार्थ काही कागदपत्रांचे फोटोही त्यांनी शेअर केले आहेत. यामध्ये बीडमधील वाईनच्या दुकानांसंदर्भात त्यांनी आरोप केला आहे. यासाठी त्यांना आलेल्या एका पत्राचा उल्लेख अंजली दमानिया यांनी केला आहे.