Sanjay Raut:राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून शरद पवारांच्या ८ पैकी ७ खासदारांना आपल्याकडे येण्याची ‘ऑफर’ देण्यात आली होती, असं म्हटलं जात आहे. यावर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “शरद पवारांच्या पक्षाचे खासदार फुटत नाहीत तोपर्यंत अजित पवारांच्या गटाला केंद्रात मंत्रिपद मिळणार नाही. हे मंत्रिपद प्रफुल्ल पटेल यांना हवं आहे. पटेल यांना सांगितलं गेलं आहे की खासदारांचा कोटा पूर्ण करा. शरद पवारांच्या गटाचे सहा ते सात खासदार फोडले की तुम्हाला मंत्रिपद मिळेल.देशाला त्याचा काहीही उपयोग नाही. प्रफुल्ल पटेल,सुनील तटकरेंना केंद्रात मंत्री व्हायचं आहे. त्यामुळे फोडाफोडीचा नीच आणि निर्ल्लज प्रकार सुरु आहे.”,असं संजय राऊत म्हणाले.