Buldhana: बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात तीन गावांमध्ये जवळपास ५० हून अधिक व्यक्तींना अचानक केसगळती होत असून काही दिवसातच त्यांचे चक्क टक्कल पडत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. हा आजार नेमका कोणता आहे, याबाबत सर्वच अनभिज्ञ असल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. तर गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.