Avinash Jadhav: भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आज शिवतीर्थवर दाखल झाले. राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्या भेटीनंतर मनसे आणि भाजपा यांच्या युतीची चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागली. आता मनसे आणि भाजपाच्या युतीच्या चर्चेवर मनसे नेते अविनाश जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे.