Rohit Pawar : विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचं सरकार सत्तेत आलं, या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठं अपयश मिळालं. या अपयशानंतर आता महाविकास आघाडीतील पक्षांकडून अपयशाची कारणे शोधण्याचं काम सुरु आहे. असं असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांना संपर्क करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. अजित पवार गटाकडून शरद पवारांच्या ८ पैकी ७ खासदारांना आपल्याकडे येण्याची ‘ऑफर’ देण्यात आली होती,अशी चर्चा आहे. यावर आता आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.