Ajit Pawar on Pune Crime Rate Rises : पुण्यातील गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. पुण्यात अलीकडच्या काळात खून, दरोडे, हिट अँड रनच्या घटना वाढल्या आहेत. अनेक गुन्हेगारी टोळ्या या शहरात सक्रीय आहेत. त्यामुळे पुणेकरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यावरून अजित पवारांनी पोलीस प्रशासनावर नाराजी व्यक्त केली.