सामनातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कौतुकामुळे उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवरून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या की, नेत्यांमध्ये वैचारिक मतभेद असतात पण वैयक्तीत नसतात. राजकारणात एकेकाळी शत्रू असणारा पुढे मित्र होतो तर कधी मित्र असणारा शत्रू होतो, असं विधान अमृता फडणवीस यांनी केलं आहे.