Torres Scam: सर्व सामान्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केलेल्या टोरेस घोटाळ्याचा (Torres Ghotala) तपास सध्या सुरू असून या प्रकरणी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. हा घोटाळा ज्या दोन युक्रेनिअन नागरिकांनी केला ते सध्या फरार आहेत. तर मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून टोरेसच्या दादर कार्यालयाच्या सीईओचा शोध सुरु आहे. हा सीईओ (Torres Company CEO) चक्क दहावी नापास असल्याची धक्कादायक माहिती तपासादरम्यान समोर आली आहे.