Beed Murder Case: संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांची हत्या होऊन एक महिन्याचा कालावधी झाला आहे. तरी देखील अद्याप या प्रकरणातील एक आरोपी फरार असून त्याला तात्काळ अटक करावी या मागणीसाठी देशमुख कुटुंब आंदोलन करणार आहे. या प्रकरणाचा तपास केला जातो. परंतु आम्हाला अद्यापही एकदाही याबाबत माहिती दिली नाही. नेमका तपास कसा होतो याबद्दलच आम्हाला प्रश्न निर्माण झाला असून यावर सीआयडीचे अधिकारी कोणतीही माहिती देत नसल्याने आम्ही आंदोलन करणार असल्याचे धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) यांनी स्पष्ट केलंआहे.