मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी अद्याप मोकाट आहेत. तपासाबाबत निर्माण होणारे प्रश्न यावरून संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आधीच आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार आज त्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं. यावेळी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी त्यांची मनधरणी केल्यानंतर धनंजय देशमुख यांनी आंदोलन मागे घेतलं आहे.