बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांनी ९ डिसेंबरला हत्या करण्यात आली. या घटनेनंतर महाराष्ट्रातलं राजकीय आणि सामाजिक वातावरण पूर्णपणे ढवळून निघालं आहे. दरम्यान न्याय मिळावा म्हणून मस्साजोगचे गावकरी आणि संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे आंदोलन करण्यासाठी बसले आहेत. यावेळी मनोज जरांगेंनी त्यांच्या आंदोलनाला भेट दिली.