महाराष्ट्राच्या उत्तर किनाऱ्यावर उभे राहात असलेले वाढवण बंदर हे जगातील सर्वात मोठ्या दहा बंदरांपैकी एक तर असणार आहेच. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे ते सरकारी मालकीच्या कंपनीतर्फे उभे राहते आहे. गेल्या अनेक वर्षांत खासगी मालकीच्या कंपन्यांनी बंदर विकासाचे प्रकल्प राबवले. त्या पार्श्वभूमीवर हा प्रकल्प महत्त्वाचा ठरतो. वाढवण बंदर महाराष्ट्र आणि देशाच्या विकासासाठी का महत्त्वाचे याबाबतचा उलगडा ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांच्या ‘दृष्टिकोन’मधून