शिवसेना शिंदे गटातील नेते, उपनेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक सोमवारी मुंबईत पार पडली. या बैठकीत उद्धव ठाकरेंची बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करावी, असा ठराव करण्यात आला. बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे (शिंदे गट) ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी यासंदर्भातील माहिती दिली. तसंच या ठरावाचं पत्र लवकरच शासनाकडे दिलं जाईल असंही ते म्हणाले.