बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरून उद्धव ठाकरेंची हकालपट्टी करावी, असा ठारव शिंदे गटाकडून मांडण्यात आला आहे. यावर आता ठाकरे गटाचे खासदरा संजय राऊत यांनी प्रत्युत्तर देत शिंदे गटावर सडकून टीका केली आहे.हातामध्ये सत्ता आणि पैसा आहे म्हणून त्यांची ही मस्ती चालली आहे. स्मारक समितीवरून उद्धव ठाकरेंना काढा असं बोलताना यांच्या जिभा झडत कशा नाहीत? असा प्रश्नही राऊतांनी उपस्थित केला.