Pandit Vishnu Rajoriya: मध्य प्रदेशच्या परशुराम कल्याण बोर्डाचे अध्यक्ष (कॅबिनेट दर्जा) पंडित विष्णू राजोरिया यांनी ब्राह्मण जोडप्यांना एक अजब आवाहन केलं.”चार मुलांना जन्म देणाऱ्या जोडप्यांना एक लाख रुपये रोख देणार”, अशी घोषणा परशुराम कल्याण बोर्डाच्या अध्यक्षांनी केली आहे . रविवारी इंदूरमधील एका कार्यक्रमात बोलत असताना राजोरिया यांनी ही घोषणा केली.