Walmik Karad: खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याच्या वयोवृद्ध आईने परळी शहर पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. पारुबाई बाबुराव कराड असे त्यांचे नाव असून सकाळपासून त्यांनी ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली आहे. एकीकडे आज वाल्मिक करडाची सीआयडी कोठडी संपणार असून त्याला केज न्यायालयात हजर केले जाणार आहे. अशातच कराडच्या आईने हे आंदोलन सुरू केले आहे. माझ्या मुलाला जोपर्यंत न्याय मिळत नाही, त्याला सोडलं जात नाही तोपर्यंत इथेच ठिय्या आंदोलन करणार असल्याची प्रतिक्रिया वाल्मिक कराडची आई पारुबाई कराड यांनी दिली आहे.