राखेने माखलेले, विस्कटलेले केस, वाढलेली नखं, जटाधारी अशा अघोरींचे अनेक व्हिडीओ तुम्हाला गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर दिसत असतील. त्याचं मुख्य कारण म्हणजे अर्थात २०२५चा महाकुंभमेळा. १३ जानेवारीपासून महाकुंभमेळ्याची सुरुवात झाली आहे. कोटींच्या घरात भाविक कुंभमेळ्यासाठी दाखल झाले आहेत. महाकुंभमेळ्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. मात्र या कुंभमेळ्यात लक्षवेधी ठरतात ते अघोरी. हे ‘अघोरी साधू’ नेमके कोण आहेत, कुंभमेळ्यातील त्यांचा सहभाग याविषयी जाणून घेऊ.