एकीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांकडून केली जात आहे. तर दुसरीकडे वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ त्याची आई आता मैदानात उतरली आहे. वाल्मिक कराडची आई पारुबाई यांनी परळी शहर पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन पुकारलं आहे. हे सगळे गुन्हे खोटे असून माझ्या मुलावर अन्याय केला जातोय, असं त्या म्हणाल्या. जोपर्यंत न्याय मिळत नाही, त्याला सोडलं जात नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन करणार असल्याची भूमिका वाल्मिक कराडच्या आईने घेतली आहे. आता यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी थेट वाल्मिक कराडच्या आईला काही प्रश्न केले आहेत.