खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई केली जाणार आहे. तसंच त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आता वाल्मिक कराडचे कुटुंबीय आणि समर्थक आक्रमक झाले आहेत. आमच्या समाजाला दाबण्यासाठी वाल्मिक कराडला फसवलं जात आहे, असा आरोप पत्नीने केला आहे. यावेळी मंजिरी कराड यांनी आमदार सुरेश धस यांना देखील उत्तर दिलं आहे.