आगामी महानगर पालिकेच्या पार्श्वभूमीवर पिंपरी- चिंचवड भाजप ने जोरदार तयारी सुरू केली आहे. २०१७ मध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांनी राष्ट्रवादी चा सुपडा साफ केला. त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करू असा विश्वास भाजप शहराध्यक्ष तथा आमदार शंकर जगताप यांनी व्यक्त केला आहे. ते पिंपरीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.