Sanjay Raut: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी हे मुंबईत महायुतीचे आमदार आणि मंत्री यांच्याशी संवाद साधणार आहेत. या दरम्यान पंतप्रधान मोदींच्या मुंबई भेटीबद्दल तसेच आजच्या कार्यक्रमापासून धनंजय मुंडेना दूर ठेवल्याची चर्चा देखील होत आहे. या मुद्द्यावर शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.