भाजपा आमदार सुरेश धस व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात परळी तालुक्यातील पांगरी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. मागील तासभरापासून बीड-परळी महामार्गावर ठिय्या मांडून पांगरी ग्रामस्थांचे आंदोलन सुरू आहे. तर तरुणांनी थेट मोबाईल टॉवरवर चढून आंदोलनाला सुरुवात केली आहे. वाल्मिक कराडवर दाखल झालेले गुन्हे खोटे असून या प्रकरणात त्यांना न्याय मिळावा या मागणीसाठी ग्रामस्थांनी हे ठिय्या आंदोलन केले आहे.