Saif Ali Khan: काल रात्री अभिनेता सैफ अली खान यांच्या घरी जी घटना घडली त्याअनुषंगाने आमची चौकशी सुरू आहे. आरोपीने पायऱ्यांचा वापर करून सैफ अली खानच्या घरात प्रवेश केला. त्या आरोपीची माहिती आम्हाला मिळाली आहे. त्याला अटक करण्याकरता १० पथके विविध पातळीवर काम करत आहेत. आताच्या तपासात असं निष्पन्न होत आहे की चोरीच्या उद्देशाने सैफच्या घरात प्रवेश केला होता. आरोपीला अटक होताच पुढची माहिती दिली जाईल, अशी माहिती मुंबई पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.