Saif Ali Khan: बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. आता काँग्रेस पक्षाच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी या घटनेवरून मुंबईसह संपूर्ण राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. तसेच महाराष्ट्रात जे घडतंय ते धक्कादायक आहे’, असं म्हणत खासदार वर्षा गायकवाड यांनी संताप व्यक्त केला आहे.