बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर चाकू हल्ला झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेवर आता राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी एक्स या प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली आहे.“सैफ अली खानवर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो”, असं या पोस्टमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी लिहिलं आहे.