Beed Violence: बीड जिल्ह्यात खुनाच्या घटना थांबायच्या नाव घेत नाहीये. आष्टी तालुक्यात जमावाच्या हल्ल्यात दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. आष्टी तालुक्यातील वाहिरा येथे गुरुवारी रात्रीच्या सुमारास त्यांच्याच समाजातील काही लोकांनी लोखंडी रॉड, धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात दोन संख्या भावांचा जागीच मृत्यू झाला. तर आणखी एक जण गंभीर जखमी आहे. याप्रकरणी अंभोरा पोलीस अधिक तपास करत आहेत.