Ladki Bahin Yojana New Update: विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुतीने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना १५०० रुपयांवरून पुन्हा महायुतीचं सरकार आल्यास २१०० रुपये वाढीव निधी देऊ अशी घोषणा केली होती. विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार सत्तेत आलं. मात्र, राज्य सरकारने अद्याप लाडक्या बहिणींना २१०० रुपये वाढीव निधी देण्याच्या संदर्भात कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे २१०० रुपये लाडक्या बहिणींना मिळणार की नाही? तसेच मिळणार असतील तर कधी? याबाबत वेगवेगळे सवाल उपस्थित करण्यात येत आहेत. यावरून विरोधकांनीही अनेकदा सवाल उपस्थित केले आहेत. दरम्यान, आता यासंदर्भात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महत्वाची माहिती दिली आहे.