Beed Student killed in Chh. Sambhajinagar: शिक्षणासाठी बीड जिल्ह्यातून छत्रपती संभाजीनगर शहरात आलेल्या १९ वर्षीय प्रदीप विश्वनाथ निपटे या तरुणाच्या खुनाचे गूढ उलगडण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. प्रदीप सोबतच राहत असलेल्या मावस भावानेच प्रदीपचा खून केलाचं निष्पन्न झाले आहे. केवळ ६५,००० रुपयांमुळे हा खून करण्यात आला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त नितीन बागाटे यांनी दिली. प्रदीप निपटे आणि त्याचा मावस भाऊ हे इतर दोन साथीदारांसह उस्मानपुरा येथे राहत होते. तर मकर संक्रांतिच्या दिवशी संध्याकाळी प्रदीप याचा मृतदेह त्याचाच रूममध्ये आढळून आला होता.