NCP MLA Jitendra Awhad Reacts On Saif Ali Khan Attack: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या एका दाव्याने खबळबळ उडाली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे की सैफ अली खानवर प्राणघातक हल्ला होऊन तो बचावला असला तरी हल्लेखोराला सैफचा मुलगा तैमूर याला मारायचं होतं. तैमूरही या हल्ल्यातून बचावला आहे. सत्य कोणीच सांगणार नाही. सत्य सांगायला कोणी पुढे येणार नाही. तैमूरच्या नावामुळे त्याचा द्वेष केला जातो. समाजात एक विकृती पसरली आहे”.