Narayan rane On Maratha Reservation: मराठा समाजातील कुठलाही माणूस स्वतःला कुणबी म्हणवून घेणार नाही, आम्हाला कुणबीचे आरक्षण नको. अशा शब्दात खासदार नारायण राणे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. मागास समाज म्हणून घटनेच्या 15 आणि 16 (4) मध्ये जी प्रोव्हिजन आहे, सर्व्हे करून मागासलेपणा आढळल्यास राज्य सरकारला आरक्षण द्यायचा अधिकार आहे असंही राणेंनी पुढे म्हटलं आहे.