Saif Ali Khan Attack Accused Caught By Mumbai Police: सैफ अली खानवर झालेल्या हल्ला प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी मुख्य आरोपीला ठाणे येथून अटक केली आहे. शनिवारी मध्यरात्री उशिरा ठाणे येथील हिरानंदानी इस्टेट येथे सुरू असलेल्या मेट्रो बांधकामाजवळील कामगार छावणीतून त्याला अटक करण्यात आली आहे. १६ जानेवारीला सैफ अली खानच्या घरात घुसून अभिनेत्यावर चाकू हल्ला केल्याची कबुली या हल्लेखोराने पोलिसांसमोर दिली आहे. पुढील चौकशीसाठी त्याला खार पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं आहे.