बीडचे पालकमंत्रिपद उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे. यासाठी भाजपा आमदारसुरेश गेल्या यांनी अजित पवार यांचं अभिनंदन केलं आहे. महिनाभरापासून संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या पालकमंत्रिपदाच्या यादीतून धनंजय मुंडेंचं नाव वगळण्यात आलं आहे.