Uddhav Thackeray in Bhandup Harinam Saptah : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अखिल भांडुप वारकरी सांप्रदाय मंडळाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहास हजेरी लावली. यावेळी विठुमाऊलींसह संतांचे दर्शन घेतले आणि सामूहिक आरतीमध्ये ते सहभागी झाले. त्यानंतर त्यांनी उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी ते म्हणाले, “नवीन वर्ष सुरू होऊन १७, १८ दिवस झाले, पण माझ्या नवीन वर्षाची सुरुवात आजपासून झाली आहे. आजचा हा माझा पहिला कार्यक्रम आहे. इथे मी या वर्षात पहिल्यांदाच माईक हातात धरला आणि तो ही तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने. पांडुरंगाच्या दर्शनाने या नवीन वर्षाची सुरुवात केली. यावेळी हिंदुत्व सोडण्याचा मुद्दा, सत्ता मिळवण्यासाठी घडलेलं राजकारण अशा विविध मुद्द्यांवर ठाकरेंनीं भाष्य केलं.