शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांना जळगावचं पालकमंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मात्र पालकमंत्रिपदाच्या यादीतून भरत गोगावले आणि दादा भुसे यांना वगळण्यात आलं आहे. त्याबाबत आपण शिंदेंना विचारणार आहे, की असं काय झालं की त्यांनी डावलण्यात आलं. आमच्या लोकांचा विचार करायला हवा होता, असं गुलाबराव पाटील म्हणाले.